सत्तांतरानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच या तारखेला येणार मुंबईत

एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड केले आणि राज्यामध्ये शिंदे-फडणवीस सरकार आले, मात्र यामध्ये भाजपचा मोठा हात असल्याची टीका वारंवार करण्यात आली
सत्तांतरानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच या तारखेला येणार मुंबईत

शिंदे -फडणवीस सरकार आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदा मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. अशामध्ये १९ जानेवारीला मुंबईत येणार असून त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. ते मुंबईतील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई मेट्रो २ ए आणि मेट्रो ७चे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या संदर्भात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात येणार आहे. तसेच, आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले आणि राज्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आले. यामध्ये भाजपचा हात असल्याची टीका सातत्याने विरोधीपक्षाकडून करण्यात आली. या सर्व घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र अमोदी हे पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर येत असल्याचे हा अतिशय महत्त्वाचा दौरा मानला जात आहे. आगामी मुंबईतील बीएमसीच्या निवडणूक, तसेच अनेक विकासकामांच्या उदघाटनांसाठी ते मुंबईत येणार असल्याची चर्चा आहे. यावेळी भाजप बीकेसीवर मोठा कार्यक्रमदेखील घेण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

logo
marathi.freepressjournal.in