पंतप्रधानांच्या रोड शोच्यावेळी स्टेज कोसळले; १० जण जखमी

नरेंद्र मोदी यांनी रविवारी जबलपूर येथे रोड शो केला. या कार्यक्रमासाठी हजारो लोक रस्त्यावर उतरले होते. गर्दीमध्ये रस्त्यावरील एक स्टेज कोसळल्याची घटना घडली आहे. पंतप्रधानांना पाहण्यासाठी लोक स्टेजवर चढले होते.
पंतप्रधानांच्या रोड शोच्यावेळी स्टेज कोसळले; १० जण जखमी
Published on

जबलपूर : जबलपूरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोच्या वेळी रस्त्याच्या कडेला स्वागतासाठी उभे केलेले स्टेज कोसळल्याने दहापेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. जखमींमध्ये महिला, पत्रकार आणि लहान मुलांचा समावेश आहे.

नरेंद्र मोदी यांनी रविवारी जबलपूर येथे रोड शो केला. या कार्यक्रमासाठी हजारो लोक रस्त्यावर उतरले होते. गर्दीमध्ये रस्त्यावरील एक स्टेज कोसळल्याची घटना घडली आहे. पंतप्रधानांना पाहण्यासाठी लोक स्टेजवर चढले होते. पोलिसांनी सांगूनही लोकांनी ऐकलं नाही. त्यामळे स्टेज कोसळले आणि लोक जखमी झाले.

logo
marathi.freepressjournal.in