जो देश आपला वारसा जपत नाही, त्या देशाचे भविष्य अंध:कारमय - मोदी

गुजरातमधील अहमदाबाद शहरातील साबरमती येथे १२०० कोटी रुपयांच्या गांधी आश्रम मेमोरियल मास्टर प्लॅनचा शुभारंभ मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला.
जो देश आपला वारसा जपत नाही, त्या देशाचे भविष्य अंध:कारमय - मोदी

साबरमती : जो देश आपला वारसा जपत नाही, त्या देशाचे भविष्य अंध:कारमय असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी साबरमती येथे सांगितले.

गुजरातमधील अहमदाबाद शहरातील साबरमती येथे १२०० कोटी रुपयांच्या गांधी आश्रम मेमोरियल मास्टर प्लॅनचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला. तसेच १२ मार्च १०३० रोजी महात्मा गांधींनी काढलेल्या प्रसिद्ध दांडी यात्रेच्या किंवा सॉल्ट मार्चच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पुनर्विकसित कोचरब आश्रमाचे उद्घाटन केले. त्यावेळी मोदी बोलत होते.

साबरमती आश्रम हा केवळ देशाचा वारसा नाही तर संपूर्ण मानवजातीचा वारसा आहे, साबरमती आश्रम हे केवळ आपल्या स्वातंत्र्य चळवळीचेच नव्हे तर ‘विकसित भारत’चे तीर्थस्थान बनले आहे, असेही मोदी म्हणाले. ते म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर स्थापन झालेल्या सरकारकडे साबरमती आश्रमसारख्या वारसास्थळांची देखभाल करण्याची मानसिकता किंवा राजकीय इच्छाशक्ती नव्हती. त्याची दोन कारणे होती. एक म्हणजे भारताकडे विदेशी दृष्टिकोनातून पाहणे आणि दुसरे म्हणजे तुष्टीकरणाचे राजकारण ज्यामुळे आमचा वारसा नष्ट झाला असे सांगत मोदी म्हणाले की, त्यांच्या सरकारची ‘व्होकल फॉर लोकल’ ही मोहीम म्हणजे महात्मा गांधींच्या ‘स्वदेशी’ कल्पनेचा अवलंब करणारी आहे.

logo
marathi.freepressjournal.in