आम्ही दहशतवाद्यांना घरात घुसून मारले! उत्तराखंडमधील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य

उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे गुरुवारी एका निवडणूक प्रचारसभेत ते बोलत होते. भूतकाळातील कमकुवत काँग्रेस सरकार सीमेवरील पायाभूत सुविधा मजबूत करू शकल्या नाहीत. आता सीमेवर रस्ते आणि आधुनिक बोगदे बांधले जात आहेत. भूतकाळाच्या तुलनेत भाजप सरकारच्या नेतृत्वाखाली देश अनेक पटींनी मजबूत आणि स्थिर झाला आहे, असे ते म्हणाले.
आम्ही दहशतवाद्यांना घरात घुसून मारले! उत्तराखंडमधील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य

ऋषिकेश : देशात जेव्हा जेव्हा कमकुवत आणि अस्थिर सरकार होते तेव्हा शत्रूंनी फायदा घेतला आणि दहशतवाद पसरला. पण मजबूत मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली आमचे सैन्य दहशतवाद्यांचा त्यांच्या भूमीत घुसून खात्मा करत आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले.

उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे गुरुवारी एका निवडणूक प्रचारसभेत ते बोलत होते. भूतकाळातील कमकुवत काँग्रेस सरकार सीमेवरील पायाभूत सुविधा मजबूत करू शकल्या नाहीत. आता सीमेवर रस्ते आणि आधुनिक बोगदे बांधले जात आहेत. भूतकाळाच्या तुलनेत भाजप सरकारच्या नेतृत्वाखाली देश अनेक पटींनी मजबूत आणि स्थिर झाला आहे, असे ते म्हणाले. स्वातंत्र्याच्या सात दशकांनंतर जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याचे, तिहेरी तलाकविरोधात कायदा करण्याचे, वन रँक वन पेन्शन योजना लागू करण्याचे आणि महिलांना विधिमंडळात आरक्षण देण्याचे धाडस भाजपच्या मजबूत सरकारने दाखवले. 'फिर एक बार मोदी सरकार' घोषणांचा प्रतिध्वनी देशभर ऐकू येत आहे, कारण लोकांनी स्थिर सरकारचे फायदे पाहिले आहेत, असे मोदी म्हणाले.

विकसित भारताची आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी हे आवश्यक आहे. त्यामध्ये विकसित उत्तराखंड महत्त्वपूर्ण भाग असणार आहे. आमच्या सरकारने भ्रष्टाचाऱ्यांची लूट थांबवली आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील जनता काँग्रेसला धडा शिकवेल याचा मला विश्वास आहे, असेही मोदी म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in