तरुणांनी राष्ट्र उभारणीसाठी समर्पित व्हावे; पंतप्रधानांचे आवाहन

सेवा, नवोपक्रम, शिक्षण आणि शिस्तीच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीसाठी देशातील तरुणांनी समर्पित व्हावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील भारत घडवणे ही आजच्या पिढीची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तरुणांनी राष्ट्र उभारणीसाठी समर्पित व्हावे; पंतप्रधानांचे आवाहन
तरुणांनी राष्ट्र उभारणीसाठी समर्पित व्हावे; पंतप्रधानांचे आवाहन
Published on

मैसुरू (कर्नाटक) : सेवा, नवोपक्रम, शिक्षण आणि शिस्तीच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीसाठी देशातील तरुणांनी समर्पित व्हावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील भारत घडवणे ही आजच्या पिढीची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

येथील श्री रामकृष्ण आश्रमात 'स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युथ सेंटर'चे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. ते म्हणाले की, हे स्मारक अशा तरुणांना घडवेल जे स्वतःपेक्षा राष्ट्राला प्राधान्य देतील आणि स्वामी विवेकानंदांच्या सेवा आणि त्यागाच्या आदर्शापासून प्रेरणा घेतील. हे केंद्र म्हणजे रामकृष्ण मिशनच्या कार्याचा एक नवा विस्तार आहे. एकेकाळी वसाहतवादी राजवटीत मर्यादांमध्ये अडकलेला देशातील तरुण आज जागतिक विकासाला गती देत आहे. आज भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे. हे कोणामुळे शक्य झाले? तर भारतातील तरुणांच्या क्षमतेमुळे ! भारताचे तरुण आज संपूर्ण जगाच्या विकासाला गती देत आहेत,' असे त्यांनी ठामपणे सांगितले.

'स्वामी विवेकानंदांनी ज्या भारताचे स्वप्न पाहिले होते, ते पूर्ण करणे ही आजच्या पिढीची जबाबदारी आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, 'विवेक स्मारक' या मोहिमेसाठी प्रेरणा आणि ऊर्जेचा एक शक्तिशाली स्रोत ठरेल," असे ते म्हणाले.

रामकृष्ण मिशनसोबतच्या आपल्या जुन्या संबंधांची आठवण करून देताना पंतप्रधानांनी सांगितले की, या संस्थेने त्यांच्या जीवनाला आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या मठातील संतांशी पुन्हा एकदा संवाद साधण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

'मैसूरू हे भारताच्या शाश्वत सांस्कृतिक चेतनेचे केंद्र राहिले आहे. स्वामी विवेकानंदांचा या शहराशी असलेला संबंध आणि त्यावेळच्या मैसूरूच्या महाराजांनी दिलेला पाठिंब्यामुळेच विवेकानंदांचा पश्चिमेकडील देशांचा प्रवास सुकर होण्यात महत्त्वाची भूमिका बजावली गेली, असे त्यांनी नमूद केले.

गेल्या १२ वर्षांतील शिक्षण क्षेत्रातील कामगिरीबाबत ते म्हणाले की, ६५० हून अधिक विद्यापीठे, सुमारे १४ हजार महाविद्यालये, ४ हजाराहून अधिक आयटीआय, ९ आयआयएम, ७ आयआयटी, आणि १३ 'एम्स' स्थापना करण्यात आली आहे. तसेच एमबीबीएसच्या जागा वाढून सुमारे १.४ लाख झाल्या आहेत आणि वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या ८२३ पर्यंत पोहोचली आहे, असे ते म्हणाले.

कर्नाटक ही महान लेखक आणि कवींची भूमी असल्याचे सांगत पंतप्रधानांनी तरुण पिढीला कन्नड साहित्याशी अधिक जोडण्याचे आवाहन केले. तसेच मैसूरूच्या हस्तकला, चंदनाचे पदार्थ आणि पारंपरिक कलाकृती भेट देऊन स्थानिक कारागिरांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

विद्यार्थिनीची माफी

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी यांच्याबाबत अपशब्द काढणाऱ्या मुलीने देशाची माफी मागितली आहे. ही माझी पहिली व शेवटची चूक आहे. मला स्वतःची लाज वाटत असल्याचे तिने सांगितले.

पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना केले माफ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रात्री इंस्टाग्रामवर व्हीडिओ जारी केला. त्यात पंतप्रधान म्हणाले की, आंदोलनादरम्यान शिवीगाळ करणाऱ्या विद्यार्थ्यांना मी माफ केले आहे. माझ्या आणि माझ्या दिवंगत आईबद्दल वापरलेले अपशब्द नक्कीच वेदनादायी होते, परंतु तरुणांना त्यांच्या चुकांमधून शिकण्याची संधी मिळायला हवी."

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in