PM नरेंद्र मोदींनी केलं देशातील सर्वात मोठ्या केबल ब्रिजचं उद्घाटन, जाणून घेऊयात 'सुदर्शन सेतू'बद्दल सविस्तर माहिती

या पूलाच्या बांधकामामुळे स्थानिकांना तसंच द्वारकेत येणाऱ्या भाविकांना खूप फायदा होणार आहे.
Narendra Modi
Narendra Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वात लांब केबल पूल 'सुदर्शन सेतू'चं गुजरातच्या द्वारका येथे उद्घाटन केलं. अटल सेतूनंतरचा हा देशातील सर्वात लांब केबल पूल आहे. हा केबल पूल ओखाच्या समुद्रात असलेलं बेट द्वारकाला जोडतो. या पूलाच्या बांधकामामुळे स्थानिकांना तसंच द्वारकेत येणाऱ्या भाविकांना खूप फायदा होणार आहे. जाणून घेऊयात या पूलाच्या वैशिष्ट्यांबद्दल सविस्तर माहिती.

देशात पायाभूत सुविधांच्या प्रकल्पाचं आणखी एक उत्तम उदाहरण पाहायला मिळालं आहे. सुदर्शन सेतू असं या प्रकल्पाचं नाव आहे. हा देशातील सर्वात लांब केबल ब्रिज आहे. पंतप्रधान मोदींनी हे ब्रिज राष्ट्राला समर्पित केलं आहे.

या 'सुदर्शन सेतू'ची खासीयत काय आहे?

'इतका' लांब आहे पूल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या द्वारकामध्ये सुदर्शन सेतुचं उद्घाटन केलं. हा केबल ब्रिज ओखाला समुद्रात असलेल्या द्वारका बेटापर्यंत जोडतो. या ब्रिजच्या लांबीबद्दल बोलायचं झालं तर हा ब्रिज जवळपास २.३२ किलोमीटर लांब आहे.

२०१६ मध्ये मिळाली होती मंजूरी

केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी २०१६ मध्ये या पूलाचं बांधकाम करण्यासाठी परवानगी दिली होती. पंतप्रधान मोदींनी ७ ऑक्टोबर २०१७ ला ओखा आणि बेट द्वारकाला जोडणाऱ्या पुलाची पायाभरणी केली होती. याआधी या पुलाची अंदाजे किंमत ९६२ कोटी रुपये एव्हढी होती. परंतु, त्यानंतर ही किंमत वाढवण्यात आली.

'सुदर्शन सेतू'बाबत 'या' आहेत खास गोष्टी

१) सुदर्शन सेतू बांधण्यासाठी तब्बल ९७९ कोटी रुपये खर्च आला आहे. याला ओखा-बेट द्वारका सिग्नेचर ब्रिजच्या नावानंही ओळखलं जाणार आहे. द्वारकाधीश मंदीरात येणाऱ्या भाविकांसाठी आणि स्थानिक नागिरकांना या पुलाचा खूप फायदा होणार आहे.

२) चार लेनच्या २७.२० मीटर रुंदीच्या पूलावर दोन्ही बाजूला २.५० मीटर रुंद फुटपाथ आहेत. हे सुदर्शन सेतूचं अप्रतिम डिझाईन असल्याचं सांगितलं जात आहे. याच्या दोन्ही बाजू भगवतगीताचे श्लोक आणि श्री कृष्ण देवाच्या प्रतिमेनं सजवण्यात आल्या आहेत.

३) येथील फुटपाथच्या वरच्या भागात सौरउर्जाचे पॅनेलही लावण्यात आले आहेत. ज्यामध्ये एक मेगावॅट वीजही निर्माण होणार आहे.

४) सुदर्शन सेतूच्या बांधण्याआधी भाविकांना द्वारकेत पोहोचण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यांना बोटीची प्रतिक्षा करावी लागत होती. हवामान खराब असल्यावर लोकांना प्रतीक्षा करावी लागत होती. आता या पूलाचं बांधकाम झाल्यानंतर द्वारकातील पर्यटनाला चालना मिळणार आहे. तसंच प्रवास करणाऱ्या लोकांचा वेळही वाचणार आहे.

५) या पूलाचं डेक कंपोजिट स्टी-रिइनफोर्स्ड काँक्रिटने बनवला आहे.

६) ज्या पूलाला सिग्नेचर नावाने ओळखलं जात होतं, आता त्याच नाव बदलून सुदर्शन सेतू किंवा सुदर्शन ब्रिज असं करण्यात आलं आहे. बेट द्वारका ओखा बंदराजवळ आहे. जे द्वारका शहरापासून जवळपास ३० किलोमीटर लांब आहे. येथे श्री कृष्ण देवाचं प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिर आहे.

logo
marathi.freepressjournal.in