नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात अतिरेक्यांनी गुलाम मोहमद दार नामक हेड कॉन्स्टेबलची गोळी झाडून हत्या केली. पट्टन भागातील क्रालपोरास्थित त्याच्या निवासस्थानाबाहेरच अतिरेक्यांनी त्याला गोळ्या झाडल्या. दार यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण आधीच त्यांनी प्राण सोडले होते.
गेल्या ७२ तासांत काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांची ही तिसरी वेळ आहे. सोमवारी उत्तर प्रदेशचा एक नागरिक पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात बळी गेला होता. तसेच पुलवामातील राजपोरा क्षेत्रात मुकेश सिंग यांना मंगळवारी दुपारी १२.४५ वाजता गोळी घालण्यात आली.