श्रीनगर : येथे एका पोलीस अधिकाऱ्याला दहशतवाद्यांनी रविवारी गोळ्या घातल्या. यात हा अधिकारी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलीस निरीक्षक मसरूर वाणी हे ईदगाह मैदानात स्थानिक मुलांसोबत क्रिकेट खेळत होते. तेव्हा दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर तत्काळ त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. या हल्ल्यानंतर परिसराला सुरक्षा दलांनी वेढा घातला आहे. या प्रकरणी तक्रार दाखल झाली असून पुढील तपास सुरू आहे.