मणिपूरमध्ये अतिरिक्त पोलीस अक्षीक्षकाचे अपहरण

मणिपूरमध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमितकुमार मोइरांगथेम यांचे अपहरण केल्याच्या निषेधार्थ बुधवारी पोलीस दलातील कमांडोंनी शस्त्रे खाली ठेवली आणि...
मणिपूरमध्ये अतिरिक्त पोलीस अक्षीक्षकाचे अपहरण
(संग्रहित छायाचित्र)

इम्फाळ : मणिपूरमध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमितकुमार मोइरांगथेम यांचे अपहरण केल्याच्या निषेधार्थ बुधवारी पोलीस दलातील कमांडोंनी शस्त्रे खाली ठेवली आणि जेव्हा हल्ला होईल तेव्हा त्याचा प्रतिकार करण्याची आम्हाला अनुमती द्यावी, अशी मागणी केली.

तणाव वाढल्याने मंगळवारी मणिपूर पूर्वमध्ये लष्कराला पाचारण करावे लागले आणि अधिकाऱ्याच्या अपहरणानंतर आसाम रायफल्सच्या चार तुकड्या तैनात करण्यात आल्या.

पाचही जिल्ह्यातील कमांडोंनी शस्त्रे खाली ठेवली आणि अरंबाई तेनग्गोल या मैतेई मूलतत्त्ववादी गटावर कारवाई करावी आणि कमांडो जेव्हा कारवाई करतील तेव्हा त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप होऊ नये, अशी मागणीही केली.

मंगळवारी मेइरा पायबीस या महिला स्वयंसेवक गटाने आणि अरंबाई तेनग्गोलच्या काही जणांनी पोलीस अधिकाऱ्याचे अपहरण केले होते.

logo
marathi.freepressjournal.in