भावनिक मुद्यांचा राजकीय गैरवापर ;राहुल गांधी: मुख्य मुद्यांपासून जनतेचे लक्ष भरकटवले जातेय

कोट्यवधी तरुण न्याय योद्धा होऊन संघर्ष करण्यासाठी मैदानात उतरत आहेत. ते स्वामी विवेकानंदाच्या शिकवणीतून प्रेरणा घेत आहेत
भावनिक मुद्यांचा राजकीय गैरवापर ;राहुल गांधी: मुख्य मुद्यांपासून जनतेचे लक्ष भरकटवले जातेय

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपच्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर अप्रत्यक्ष टीका करतांना भावनिक मुद्यांचा राजकीय गैरवापर करुन जनतेसमोरील मुख्य मुद्यांवरुन लक्ष भरकटवले जात असल्याचा आरोप शुक्रवारी केला. ही देशातील जनतेशी एकप्रकारे केलेली दगाबाजी आहे, अशी टिप्पणी देखील गांधी यांनी यावेळी केली. त्यांनी एक्सवर राष्ट्रीय युवा दिनानिमित्त हिंदी भाषेतून एक पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी आता स्वामी विवेकानंद यांचे विचार आठवायचे दिवस आले आहेत, असे म्हटले आहे. स्वामी विवेकानंदांनी युवाशक्तीला देशाची सधनता, गरीबांची सेवा यावर खर्ची घालावी, असे मत व्यक्त केले होते. आजच्या तरुणांनी त्याचा विचार करावा. आमच्या स्वप्नातील भारत कसा असावा? उत्कृष्ट जीवनशैली असावी की केवळ भावनांशी खेळ असावा, प्रेम असावे की तिरस्कार असावा, हे तरुणांनी जोखावे, असे राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

कोट्यवधी तरुण न्याय योद्धा होऊन संघर्ष करण्यासाठी मैदानात उतरत आहेत. ते स्वामी विवेकानंदाच्या शिकवणीतून प्रेरणा घेत आहेत. न्याय मिळेपर्यंत ते झगडत राहतील. अंतता न्यायाचाच विजय होर्इल, असे राहुल गांधी म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in