तांदूळ आणि डाळीच्या दरात वाढ होण्याची शक्यता ; भात आणि तूरचे क्षेत्र घटले

युक्रेनच्या संकटामुळे बहुतांश कृषी मालामध्ये घसरण झाल्याने केवळ तांदूळ आणि कडधान्यांचे उत्पादन स्थिरावले आहे
 तांदूळ आणि डाळीच्या दरात वाढ होण्याची शक्यता ; भात आणि तूरचे क्षेत्र घटले

पॅकिंग आणि लेबल असणाऱ्या वस्तूंवर ५ टक्के जीएसटी लागल्याने ते महाग झाले आहेत. तर दुसरीकडे तांदूळ आणि डाळीच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे कारण गेल्या वर्षाच्या तुलनेत शेतकऱ्यांनी या धान्याची पेरणी कमी केली आहे हेही एक मोठे कारण असणार आहे. जुलैच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत केवळ भात आणि तूर या पिकाखालील क्षेत्र घटले असून इतर सर्व पिकांच्या पेरण्या वाढल्या आहेत. याशिवाय युक्रेनच्या संकटामुळे बहुतांश कृषी मालामध्ये घसरण झाल्याने केवळ तांदूळ आणि कडधान्यांचे उत्पादन स्थिरावले आहे.

कृषी मंत्रालयाच्या आकड्यांनुसार, १५ जुलैपर्यंत भातशेतीचे क्षेत्र १७.४ टक्क्यांनी घटले आहे. उत्तर प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत भातशेतीच्या लागवड क्षेत्रात गेल्या वर्षाच्या तुलनेत ३१ टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे या राज्यात आतापर्यंत एकूण पाऊस ६८ टक्के कमी झाला आहे, तर भाताच्या शेतीसाठी जास्त पाण्याची गरज असते. तांदळाबरोबरच डाळीच्या भावातही वाढ होऊ शकते.

ओरिगो कमोडिटीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजीव यादव म्हणाले, या वर्षीदेखील तांदळाचे उत्पादन कमी झाले. काही महिन्यांपासून जगभरातील पुरवठ्यात कमतरता दिसून येते. त्यामुळे भाताला आधार मिळत आहे. ११२१सेला पांढरा तांदूळ बुंदी मार्केटमध्ये सध्याच्या ८६०० रुपये प्रति क्विंटलवरून भविष्यात ९००० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचू शकतो.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in