प्रदीप कुरुलकरांची पॉलिग्राफ चाचणी होणार? एटीएसने पुणे सेशन्स कोर्टाकडे मागितली परवानगी

अनेक प्रश्नांची उत्तरे पॉलिग्राफ टेस्ट मधून मिळण्याची आशा असल्याचे एटीएसने सांगितले आहे.
प्रदीप कुरुलकरांची पॉलिग्राफ चाचणी होणार? एटीएसने पुणे सेशन्स कोर्टाकडे मागितली परवानगी

डीआरडीओ'चे संचालक प्रदीप कुरुलकर यांना पाकिस्तानच्या इंटेलिजेन्स ऑपरेटिव्हकडून कथितपणे हनी ट्रॅप केल्यानंतर गोपनिय माहिती शेअर केली असल्याचा आरोप करत अटक करण्यात आली आहे. भारतीय संरक्षण क्षेत्राची महत्वपुर्ण माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांना दिल्याप्रकरणी त्यांची पॉलिग्राफ टेस्ट करण्याची मागणी महाराष्ट्र एटीएसने केली आहे. एटीएसकडून पुणे सेशन्स कोर्टात मंगळवारी अर्ज दाखल करुन ही मागणी करण्यात आली आहे. प्रदीप कुरुलकर यांच्याशी किती लोक संपर्कात होते, त्यांच्यात पैशाची देवाण-घेवाण झाली होती का? त्यांनी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला नेमकी कोणती माहिती शेअर केली. या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पॉलिग्राफ टेस्ट मधून मिळण्याची आशा असल्याचे एटीएसने सांगितले आहे.

एटीएसच्या म्हणण्यानुसार करुलकर यांनी ज्या पाकिस्तानी महिलेला कथित माहिती शेअर केली होती. त्यांनी त्या महिलेसोबतच्या अनेक चॅट डिलीट केल्या आहेत. ज्या एटीएस एफएसएल'च्या मदतीने परत मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

याप्रकरणी महराष्ट्र एटीएसकडून अनेक लहान-सहान गोष्टी पडताळल्या जात आहेत. यात प्रदीप कुरुलकर यांनी अत्यंत संवेदनशील अशा माहितीची देवाण-घेवाण झाल्याचा डेटा ए्फएसएलने जप्त केला आहे. कुरुलकर यांनी काही गोष्टींची माहिती अद्यापही दिलेली नाही, त्यांमुळे एटीएसकडून त्यांची पॉलिग्राफी टेस्ट करण्याची मागणी केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कुरुलकर यांना भेटण्यासाठी अनेक महिला डीआरडीओ'च्या गेस्ट हाऊसमध्ये आल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाचा देखील अधिकचा तपास सुरु आहे. चौकशी दरम्यान कुरुलकर हे अनेक प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देत नाहीत. तसेच अनेक बाबींचा खुलासा करत नाहीत, असे एटीएसने सांगितले आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या यंत्रणांना संशय आहे की, करुलकर ज्या पाकिस्तानी महिलेला परदेशात भेटायला गेले होते. त्यांनी शरीर संबंधांच्या लालसेने त्या महिलेला महत्वाची माहिती शेअर केल्याचे सांगितले जात आहे.

एटीएसकडून प्रदीप करुलकर यांच्या बँक खात्यांची तपासणी सुरु असून अद्याप कोणतेही संशयास्पद व्यवहार आढळून आले नाहीत. अशा प्रकरणात हवाल्याने तसेच अन्य कोणाच्या सहभागाने पैसे पाठवले जात असून दुसरीकडे नेले जातात. अशी माहिती एटीएसक़डून देण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in