
युवा भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानानंदाला शुक्रवारी मेल्टवॉटर चॅम्पियन्स चेस टूर चेसेबल मास्टर्स ऑनलाइन टूर्नामेंटच्या अंतिम फेरीत जागतिक दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू डिंग लिरेनकडून टायब्रेकरमध्ये पराभव पत्करावा लागला.
चेन्नईच्या १६ वर्षीय प्रज्ञानानंदाने पहिला सेट १-५, २-५ असा गमावल्यानंतर मुसंडी मारत दुसरा सेट २-५ १-५ असा जिंकला होता; मात्र टायब्रेकरमध्ये त्याला पराभूत व्हावे लागले. लिरेनने आपल्या अनुभवाचा फायदा उठवित बाजी मारली. पहिली बाजी अनिर्णीत राहिल्यानंतर लिरेनने ४९ चालीनंतर प्रज्ञानानंदचा पराभव केला. सामना टायब्रेकमध्ये नेण्यासाठी प्रज्ञानानंदाला दुसरा सेट जिंकण्याची आवश्यकता होती. दुसऱ्या सेटमध्ये त्याने ७९ चालीत विजय मिळविला.