प्रशांत किशोर विजयी; राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपला धक्का

१९९५ पासून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचा मतदारसंघ असलेल्या बिहारच्या बांकीपूर विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवाराचा पराभव करून जन सुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.
प्रशांत किशोर विजयी; राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपला धक्का
प्रशांत किशोर विजयी; राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपला धक्का(Photo-X/@pti)
Published on

पाटणा : १९९५ पासून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचा मतदारसंघ असलेल्या बिहारच्या बांकीपूर विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवाराचा पराभव करून जन सुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. मध्य प्रदेशातील दतिया मतदारसंघात भाजपचा पराभव झाला असून तेथे काँग्रेस उमेदवाराचा विजय झाला.

भाजप अध्यक्ष नितीन नबीन यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर बांकीपूर मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली. हा मतदारसंघ १९९५ पासून भाजपचा बालेकिल्ला राहिला होता आणि पक्षाने ही जागा कधीही गमावली नव्हती. या पराभवामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. प्रशांत किशोर यांनी आपले निकटचे भाजप प्रतिस्पर्धी नीरज कुमार यांचा १९,३२४ मतांच्या फरकाने पराभव केला. प्रशांत किशोर यांनी आपल्या पहिल्याच निवडणुकीत ६४,१५१ मते मिळवून इतिहास रचला.

मध्य प्रदेशातील दतिया विधानसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसने सोमवारी आपल्याकडेच राखली आहे. उमेदवाराच्या निवडीवरून भाजपमध्ये मतभेद दिसून आलेल्या या पोटनिवडणुकीत, काँग्रेसचे उमेदवार घनश्याम सिंह यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी भाजपचे आशुतोष तिवारी यांचा ६,०१६ मतांनी पराभव केला.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in