'प्रवेश वर्मा' दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री? पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका भेटीनंतर भव्य शपथविधी सोहळ्यात शपथ घेण्याची शक्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावरून परतल्यानंतर दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा होण्याची अपेक्षा आहे. पंतप्रधान मोदी १२-१३ फेब्रुवारी रोजी अमेरिका दौऱ्यावर असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतील. दिल्लीत २७ वर्षांनंतर भाजप पुन्हा सत्तेत आल्याने हा कार्यक्रम भव्य होणार आहे.
'प्रवेश वर्मा' दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री? पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका भेटीनंतर भव्य शपथविधी सोहळ्यात शपथ घेण्याची शक्यता
'प्रवेश वर्मा' दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री? पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका भेटीनंतर भव्य शपथविधी सोहळ्यात शपथ घेण्याची शक्यताFPJ
Published on

दिल्लीत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या विजयानंतर भाजपने सरकार स्थापनेची तयारी सुरू केल्याची माहिती आहे. दिल्लीचा मुख्यमंत्री कोण असेल याबाबत सध्या मोठी चर्चा रंगली आहे. यात प्रवेश वर्मा यांचे नाव आघाडीवर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावरून परतल्यानंतर दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा होण्याची अपेक्षा आहे. पंतप्रधान मोदी १२-१३ फेब्रुवारी रोजी अमेरिका दौऱ्यावर असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतील. दिल्लीत २७ वर्षांनंतर भाजप पुन्हा सत्तेत आल्याने हा कार्यक्रम भव्य होणार आहे. एनडीए शासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री या भव्य कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे, असे 'फ्री प्रेस जर्नल'च्या वृत्तात म्हटले आहे.

प्रवेश वर्मा दिल्लीचे मुख्यमंत्री होण्याची शक्यता

भाजपने अद्याप मुख्यमंत्र्यांसाठी आपली निवड जाहीर केलेली नाही, परंतु नवी दिल्लीतील नवनिर्वाचित आमदार प्रवेश वर्मा यांचेच नाव आघाडीवर असल्याचे मानले जात आहे. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांचा पराभव करून त्यांनी लक्ष वेधले. वर्मा हे पश्चिम दिल्लीचे दोन वेळा माजी खासदार राहिले आहेत. वर्मा यांना गेल्या वर्षीच्या (२०२४) लोकसभा निवडणुकीचे तिकीट नाकारण्यात आले होते. परंतु त्यांनी विधानसभा निवडणूक यशस्वीरित्या लढवली आणि केजरीवाल यांचा ४,०८९ मतांनी पराभव केला. ते दिल्लीचे माजी मुख्यमंत्री दिवंगत साहिब सिंग वर्मा यांचे पुत्र आहेत.

नवी दिल्ली मतदारसंघातून भाजपचे विजयी उमेदवार प्रवेश वर्मा यांनी पश्चिम दिल्लीतील मुंडका येथे असलेल्या डॉ. साहिब सिंग वर्मा समाधी स्थळावर त्यांचे वडील आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री दिवंगत साहिब सिंग वर्मा यांना पुष्पांजली वाहिली.

सरकार स्थापनेची तयारी

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज राष्ट्रीय राजधानीत सरकार स्थापनेबाबत चर्चा करण्यासाठी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेण्याची अपेक्षा आहे. दिल्ली भाजपचे प्रमुख वीरेंद्र सचदेवा आज संध्याकाळी ४८ नवनिर्वाचित आमदारांचीही भेट घेणार आहेत. शनिवारी (८ फेब्रुवारी) रात्री झालेल्या विजय सोहळ्यादरम्यान पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि जेपी नड्डा यांनी भाजप मुख्यालयात सरकार स्थापनेबाबत आणि शपथविधी सोहळ्याबाबत चर्चा केल्याचे वृत्त आहे.

logo
marathi.freepressjournal.in