प्रयागराजमध्ये मोठी दुर्घटना! कोल्ड स्टोरेजची भिंत कोसळून ५ ठार

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सोमवारी दुपारी एका कोल्ड स्टोरेजच्या इमारतीचा काही भाग कोसळून सुमारे २० कामगार ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या अपघातानंतर शीतगृहातून अमोनिया वायूची गळती सुरू झाली, त्यामुळे घटनास्थळी घबराट पसरली.
कोल्ड स्टोरेजची भिंत कोसळून ५ ठार
कोल्ड स्टोरेजची भिंत कोसळून ५ ठारX
Published on

लखनऊ : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सोमवारी दुपारी एका कोल्ड स्टोरेजच्या इमारतीचा काही भाग कोसळून सुमारे २० कामगार ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या अपघातानंतर शीतगृहातून अमोनिया वायूची गळती सुरू झाली, त्यामुळे घटनास्थळी घबराट पसरली. प्रशासनाने पाच जेसीबींच्या मदतीने त्वरित बचावकार्य सुरू केले. ‘एसडीआरएफ’ आणि ‘एनडीआरएफ’ची पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. आतापर्यंत नऊ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आले असून, पाच जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मात्र, प्रशासनाने अद्याप मृतांच्या संख्येला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. जखमींना उपचारांसाठी स्वरूप राणी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले

वायू दुर्गंधीमुळे लोक संतप्त

दुर्घटनेनंतर अमोनिया वायू सुमारे एक किलोमीटर परिसरात पसरला आहे. वायूच्या दुर्गंधीमुळे बहुतेक लोक रुमाल किंवा टॉवेलच्या सहाय्याने आपले चेहरे झाकून घेत आहेत. हा अपघात फाफामऊ परिसरात घडला. या घटनेमुळे लोक संतप्त झाले आहेत. पोलिसांनाही विरोधाचा सामना करावा लागला. पोलिसांनी शीतगृहाच्या व्यवस्थापकाला ताब्यात घेतले आहे. प्रयागराजचे पोलीस आयुक्त जोगिंदर कुमार आणि जिल्हा दंडाधिकारी मनीष वर्मा यांनी घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

सपा नेते अहमद कोल्ड स्टोरेजचे मालक

आदर्श कोल्ड स्टोरेज नावाची ही इमारत सपा नेते आणि माजी मंत्री अन्सार अहमद यांची आहे. हे शीतगृह अंदाजे ६० एकर जमिनीवर बांधलेले आहे. इमारतीचा ४० फूट उंच आणि ७५ फूट लांबीचा भाग कोसळला, जिथे १०० हून अधिक लोक काम करत होते. अपघातात एक मूल जखमी झाले आहे. अपघातानंतर आजूबाजूचे २०० हून अधिक लोक घटनास्थळी जमा झाले व त्यांनी त्वरित बचावकार्य सुरू केले.

logo
marathi.freepressjournal.in