प्रयागराजमधील ड्रग्जची 'फॅक्टरी' उद्ध्वस्त; गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-४ची कारवाई, ६९.७५९ किलो एमडी जप्त

मिरा-भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालय हद्दीतील नालासोपारा येथून सुरू झालेल्या एमडी (मेफेड्रॉन) तस्करीच्या तपासाची पाळेमुळे थेट उत्तर प्रदेशातील प्रयागराजपर्यंत पोहोचली असून गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-४ च्या पथकाने तेथील एमडी ड्रग्ज तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त केला आहे.
प्रयागराजमधील ड्रग्जची 'फॅक्टरी' उद्ध्वस्त; गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-४ची कारवाई, ६९.७५९ किलो एमडी जप्त
प्रयागराजमधील ड्रग्जची 'फॅक्टरी' उद्ध्वस्त; गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-४ची कारवाई, ६९.७५९ किलो एमडी जप्त
Published on

भाईंदर : मिरा-भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालय हद्दीतील नालासोपारा येथून सुरू झालेल्या एमडी (मेफेड्रॉन) तस्करीच्या तपासाची पाळेमुळे थेट उत्तर प्रदेशातील प्रयागराजपर्यंत पोहोचली असून गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-४ च्या पथकाने तेथील एमडी ड्रग्ज तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईत तब्बल ५२ किलो ९३२ ग्रॅम एमडी, मोठ्या प्रमाणात रसायने आणि ड्रग्ज निर्मितीसाठी वापरले जाणारे लॅब साहित्य जप्त करण्यात आले. या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत ६९ किलो ७५९ ग्रॅम एमडी, १८.७० लाख रुपये रोख, २६० लिटर रसायने आणि लॅब साहित्य असा एकूण सुमारे १३९ कोटींचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

नालासोपारा पूर्वेतील प्रगतीनगर परिसरात २४ जून २०२६ रोजी रात्री दोन आरोपींकडून ११२ ग्रॅम एमडी जप्त केल्यानंतर या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश सुरू झाला. अविनाश ऊर्फ सोनू अय्यर आणि रविकांत राम यांना अटक करून तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठांच्या आदेशानंतर या गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-४ कडे सोपवण्यात आला.

तपासादरम्यान पोलिसांनी नालासोपारा, मुंबई, कल्याण, नेरळ, जळगाव, गुजरात आणि उत्तर प्रदेश अशा विविध ठिकाणी कारवाया करत आतापर्यंत २१ आरोपींना अटक केली. तपासात एमडी तयार करण्यासाठी स्वतंत्र ठिकाणी फॅक्टरी उभारणे, रसायने व लॅब साहित्याची व्यवस्था करणे, तयार एमडीची तस्करी व विक्री करणे तसेच आर्थिक व्यवहार सांभाळणे, अशा विविध पातळ्यांवर हे रॅकेट कार्यरत असल्याचे समोर आले.

गुजरातमध्येही एमडी निर्मितीचा अड्डा

तपासात अटक आरोपींपैकी काहींनी कच्छ जिल्ह्यातील अबडासा तालुक्यातील ग्राम सांघाण येथे एका शेतजमिनीत एमडी तयार करण्याची अवैध फॅक्टरी सुरू केल्याचे निष्पन्न झाले. ही जमीन आरोपी जुम्मा तालाब ठाकरा याच्या मालकीची असल्याचे तपासात समोर आले असून, त्यालाही अटक करण्यात आली आहे. दरम्यान, एमडी तयार करण्यासाठी आणलेले लॅब साहित्य आणि रसायने नेरळ येथे साठवून ठेवण्यात आली होती. पोलीस कारवाईची चाहूल लागताच हे साहित्य नष्ट करण्याच्या उद्देशाने विरार-जेएनपीटी एक्स्प्रेस महामार्गावरील रायते, कल्याण परिसरात फेकण्यात आले होते.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in