भारतीय नेत्यावर आत्मघातकी हल्ल्याची तयारी; रशियाने केली कारवाई

रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी ‘इस्लामिक स्टेट’ या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या एका दहशतवाद्याला ताब्यात घेतले
भारतीय नेत्यावर आत्मघातकी हल्ल्याची तयारी;  रशियाने केली कारवाई

भारतीय नेत्यावर आत्मघातकी हल्ल्याच्या तयारीत असलेला ‘इसिस’च्या दहशतवाद्याला रशियाने ताब्यात घेतले आहे. हा अतिरेकी भारतातील सत्ताधारी पक्षातील नेत्यावर आत्मघातकी हल्ला करण्यासाठी भारतात येणार होता, त्यापूर्वीच रशियाने त्याच्यावर कारवाई केली.

रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी ‘इस्लामिक स्टेट’ या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या एका दहशतवाद्याला ताब्यात घेतले आहे. तो मध्य आशियाई देशातील रहिवासी आहे. इस्लामिक स्टेटच्या अन्य अतिरेक्यांच्या मदतीने भारतीय नेत्यावर हल्ला करण्याची योजना आखली होती. भारतातील सत्ताधारी पक्षातील नेते त्याच्या टार्गेटवर होते. फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसने या दहशतवाद्याचा एक व्हिडीओही जारी केला आहे. यात त्याने प्रेषक मोहम्मद यांचा अवमान केल्याचा आरोप करत बदल्याच्या भावनेने हा हल्ला करणार असल्याचे म्हटले आहे. हा दहशतवादी एप्रिल ते जूनदरम्यान टर्कीत होता, तिथेच एका इस्लामिक स्टेट नेत्याने त्याला आत्मघातकी बनण्याचे ट्रेनिंग दिले. इस्तंबूलमध्ये त्यांच्या बैठका होत होत्या, अशी माहितीही फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसेसच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in