अमरावती : तिरुपती मंदिरात प्रसादाचे लाडू बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात प्राण्यांची चरबी असल्याचा आरोप सत्ताधारी तेलगू देसम पक्षाने केला आहे.
गुजरातमध्ये केंद्र सरकारच्या नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या पशुधन व अन्न विश्लेषण आणि अध्ययन केंद्राच्या प्रयोगशाळेने या लाडूतील घटकांचे विश्लेषण करून अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार, मागील वायएसआर सरकारच्या काळात तिरुपती मंदिरात प्रसादाचे लाडू बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात प्राण्यांची चरबी आढळली. या तुपात माशांचे तेल, बीफ फॅट आणि चरबीचे अंश आढळले.