राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आज शपथविधी सोहळा पार पडणार

सत्ताधारी भाजपकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी यशवंत सिन्हा यांचा पराभव केला.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आज शपथविधी सोहळा पार पडणार

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत यशवंत सिन्हा यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवणाऱ्या द्रौपदी मुर्मू देशाच्या १५व्या राष्ट्रपती म्हणून निवडून आल्या आहेत. मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ रविवारी संपत असल्यामुळे मुर्मू यांचा शपथविधी सोहळा सोमवारी सकाळी १० वाजून १५ मिनिटांनी होणार आहे.

सत्ताधारी भाजपकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी यशवंत सिन्हा यांचा पराभव केला. त्या देशातील पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती आहेत. २० जून १९५८ रोजी ओडिशाच्या मयूरगंज जिल्ह्यातील बैदपोसी गावात जन्मलेल्या द्रौपदी संथाल आदिवासी वांशिक गटातील आहे. त्यांच्या वडिलांचे नाव बिरांची नारायण तुडू आहे. त्यांचा विवाह श्यामाचरण मुर्मू यांच्याशी झाला होता. द्रौपदी यांनी त्यांचा नवरा आणि दोन मुले गमावली आहेत. त्यांना इतिश्री मुर्मू नावाची मुलगी आहे. त्यांचे बालपण अत्यंत वंचित आणि गरिबीत गेले; मात्र त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर परिस्थिती आड येऊ दिली नाही आणि भुवनेश्वरच्या रमादेवी महिला महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. द्रौपदी मुर्मू आपल्या मुलीसाठी शिक्षिका म्हणून काम करू लागल्या.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in