राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू घेणार साईंचं दर्शन ; शिर्डीला छावणीचं स्वरुप

सध्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू घेणार साईंचं दर्शन ; शिर्डीला छावणीचं स्वरुप

राज्यातील शिर्डीला पोलीस छावणीच रुप आलं आहे. उद्या (जुलै ७) देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या शिर्डी दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिर्डीत घडोमोडींना वेग आला असून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सध्या महाराष्टर दौऱ्यावर असून त्या मंगळवार संध्याकाळपासून नागपूरात दाखल झाल्या आहेत. त्यांच्या स्वागतासाठी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर विमानतळा गेले होते. विदर्भात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. यानंतर त्यांनी अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली.

द्रौपदी मुर्मू या काल दिवसभरातील घडामोडी आटपून आज मुंबईत दाखल झाल्या. त्यांच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस हजर होते. आज राजभवनावर राष्ट्रपतींसाठी विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रपती मुर्मू या तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून यादरम्यान त्या शिर्डीतील साई बाबा मंदीरात देखील दर्शन घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर शिर्डीतील घडमोडींना वेग आला आहे. राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे पोलीस प्रशासन सतर्क झालं आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं शिर्डी विमानतळावर उद्या दुपारी १२ वाजता आगणार होणार असून त्या शिर्डी विमानतळापासून साईबाबांच्या मंदिरापर्यंतचा दहा ते १२ किमीचा प्रवास कारने करणार आहेत. राष्ट्रपती शिर्डीत येणार असल्याने प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरु आहे. राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थान तसंच पोलीस प्रशासनाकडून सर्वतोपरी खबरदारी घेतली जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in