President's Police Medal : 'राष्ट्रपती पोलीस पदकां'ची घोषणा; मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तांसह ४ पोलिसांचा सन्मान

आज राष्ट्रपती पोलीस पदकांची (President's Police Medal) घोषणा झाली असून राज्यातील ७४ पोलिसांना हा पुरस्कार देण्यात आला आहे
President's Police Medal : 'राष्ट्रपती पोलीस पदकां'ची घोषणा; मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तांसह ४ पोलिसांचा सन्मान

आज राष्ट्रपती पोलीस पदकांची घोषणा (President's Police Medal) करण्यात आली. यामध्ये राज्यातील ७४ पोलिसांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. यामध्ये मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याही समावेश आहे. राज्यातील ५ पोलिसांना 'राष्ट्रपती पोलीस पदक', ३१ पोलिसांना 'पोलीस शौर्यपदक' तर ३९ पोलिसांना 'पोलीस पदक' जाहीर झाले आहे.

हेही वाचा :

Deven Bharti : विशेष पोलीस आयुक्त पदी वरिष्ठ आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची नियुक्ती

मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह राज्यातील ४ जणांना राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अनुप कुमार सिंह, मुंबईतील पोलीस उपनिरीक्षक संभाजी देशमुख आणि ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव यांचा समावेश आहे. तसेच, ३१ अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. विविध जिल्ह्यांमधून एकूण ९०१ पोलिसांना पोलीस पदक जाहीर झाले आहे. १४० पोलीस शौर्य पोलीस पदकाचे मानकरी ठरले आहेत. तसेच, देशातील ९३ पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक आणि ६६८ पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक जाहीर झाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in