पक्ष, चिन्ह अजित पवारांना देण्यासाठी मोदी-शहांचा दबाव

शरद पवार यांनी दिल्लीतील मोदी-शहा राजकारणाकडे अंगुलीनिर्देश केला आहे
पक्ष, चिन्ह अजित पवारांना देण्यासाठी मोदी-शहांचा दबाव

नवी दिल्ली : शिवसेना फुटीनंतर ठाकरेंना डावलून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठी सर्वशक्तीनिशी उभी राहणारी मोदी-शहांची जोडी आता राष्ट्रवादीतील फुटीर अजित पवार गटाच्या मागे सर्व ताकद लावत आहे. या फुटीच्या राजकारणातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मोठा धक्का देण्याची भाजपची योजना आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळेल याचा बंदोबस्त केला जात आहे, असा अंदाज व्यक्त करताना शरद पवार यांनी दिल्लीतील मोदी-शहा राजकारणाकडे अंगुलीनिर्देश केला आहे.

अजित पवार बंड करून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर आमदार संख्याबळाच्या आधारे पक्ष आणि चिन्ह यांच्यावर आपलाच दावा दाखल केला आहे. सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजितदादांचे दिल्लीदरबारी वजन वाढले आहे. यामुळे दिल्लीतूनच पक्ष आणि चिन्ह अजित गटाला देण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला आहे, मात्र आपण भाजपविरोधातील आपल्या भूमिकेत कोणताही बदल करणार नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले असून, आपल्या कार्यकर्त्यांना पुढील लढार्इसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in