चेस ऑलिम्पियाडसाठी पंतप्रधान मोदींच्या हस्ते मशाल रिलेचा शुभारंभ

मोदींसोबत क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर तसेच बुध्दीबळपटू विश्वनाथन आनंद तसेच इतर बुध्दीबळ खेळाडू देखील उपस्थित होते
चेस ऑलिम्पियाडसाठी पंतप्रधान मोदींच्या हस्ते मशाल रिलेचा शुभारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर ४४ व्या फिडे चेस ऑलिम्पियाड टॉर्च रिलेचा शुभारंभ केला. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदींनी येथे उपस्थित लोकांना संबोधित केले. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींसोबत क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर तसेच बुध्दीबळपटू विश्वनाथन आनंद तसेच इतर बुध्दीबळ खेळाडू देखील उपस्थित होते.

या वर्षी प्रथमच आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने (फिडे) बुद्धिबळ ऑलिम्पियाडची मशाल रिले सुरू केली आहे. मशाल रिले ऑलिम्पिक परंपरेचा एक भाग आहे. मात्र आतापर्यंत कधीही बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये याचा समावेश करण्यात आला नव्हता.

यावर्षी भारतात प्रथमच बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे आयोजन होत आहे. चेन्नई येथे जुलै-ऑगस्टमध्ये बुद्धिबळ ऑलिम्पियाड सुरू होईल. महाबलीपुरम या स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वी ४० दिवसांच्या कालावधीत मशाल देशातील ७५ शहरांमध्ये नेण्यात येईल. प्रत्येक ठिकाणी संबंधित राज्यातील बुद्धिबळ ग्रँडमास्टर्स ही मशाल हाती घेतील. या ४४ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये १८८ देशांतील सुमारे दोन हजार खेळाडू सहभागी होणार आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in