महिला आरक्षण विधेयकाबाबत पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, म्हणाले...

महिला आरक्षणाबाबत बोलताना ते म्हणाले की, मी दोन्ही सभागृहातील खासदारांना आवाहन करतो की...
महिला आरक्षण विधेयकाबाबत पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, म्हणाले...

नव्या संसद भवनात लोकसभेचं कामकाज सुरु झालं आहे. नवीन संसदेत केलेल्या आपल्या पहिल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे. केंद्रीय कॅबीनेटमध्ये महिला आरक्षणसाठी विधेयक मंजूर करण्यात आलं. दरम्यान, हे विधेयक आज सभागृहात मांडण्यात येणार आहे. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. महिला आरक्षणासाठी घटनेत दुरुस्ती करणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, महिलांसाठी इतिहास घडवण्याची हीच वेळ आहे. महिला आरक्षणावर बरीच चर्चा झाली आहे. केंद्रीय मंत्री मंडळाने महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी दिली आहे. आज आपलं सरकार संविधात दुरुस्ती विधेयक मांडणार आहे. महिलांना लोकसभा आणि विधान सभेत आरक्षण मिळेल. महिला आरक्षण विधेयक अनेकदा मांडण्यात आले. पण अनेक पवित्र कामासाठी देवाने माझी निवड केली आहे. असं मोदी म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, चांद्रयान -३ च्या यशाचा भारतात अभिमान आहे. नव्या संकल्पाने आम्ही संसद भवनात आलो आहोत. कटुता विसरुन पुढे जायचे आहे. ही इमारत नवीन आहे. सर्व व्यवस्था नवीन आहेत. परंतु काल आणि आजला जोडणारा मोठा वारसा आहे जो नवीन नाही. , जुना आहे.

महिला आरक्षणाबाबत बोलताना ते म्हणाले की, मी दोन्ही सभागृहातील खासदारांना आवाहन करतो की तो सर्वांच्या संमतीने मंजूर करावा. आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहे. धोरणनिर्मीती महिलांची भूमिका असायला हवी. महिला आरक्षण विधेयक नारी शक्ती वंदन अधिनियम म्हणून ओळकलं जाईल, असं देखील मोदी म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in