पहिल्या हायड्रोजन ट्रेनला पंतप्रधान मोदींच्या हस्ते हिरवा झेंडा

देशातील पहिल्या हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या रेल्वेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले. हरयाणातील जिंद आणि सोनिपत या दोन शहरांदरम्यान ही गाडी धावणार आहे.
पहिल्या हायड्रोजन ट्रेनला पंतप्रधान मोदींच्या हस्ते हिरवा झेंडा
पहिल्या हायड्रोजन ट्रेनला पंतप्रधान मोदींच्या हस्ते हिरवा झेंडा
Published on

जिंद : देशातील पहिल्या हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या रेल्वेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले. हरयाणातील जिंद आणि सोनिपत या दोन शहरांदरम्यान ही गाडी धावणार आहे.

ही जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन आहे, असा दावा करून मोदी यावेळी म्हणाले की, जगभरात इतर ठिकाणी अशा ट्रेन्समध्ये अवघे ३ ते ४ डबे असतात, मात्र भारताच्या या ट्रेनला तब्बल १० डबे आहेत. ३२०० हॉर्सपॉवरची ही ट्रेन चालवून भारताने जागतिक स्तरावर आपली मोहोर उमटवली आहे.

जिंद ते सोनिपत दरम्यानचे ८९ किलोमीटरचे अंतर ही ट्रेन २ तासांत कापणार असून ती १२ स्थानकांवर थांबेल. आकर्षक आकाशी आणि पांढऱ्या रंगाची ही ट्रेन हायड्रोजन फ्युएल सेल तंत्रज्ञानावर चालते. यात हायड्रोजनचे विजेमध्ये रूपांतर करून रेल्वे धावते, ज्यातून उप-उत्पादन म्हणून फक्त पाण्याची वाफ बाहेर पडते. त्यामुळे यातून शून्य कार्बन उत्सर्जन होणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in