एनडीएला तिसऱ्यांदा विश्वास मिळणे ऐतिहासिक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया

जनतेने तिसऱ्यांदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर (एनडीए) विश्वास दाखवण्याची बाब ऐतिहासिक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचे आभार मानले आहेत.
एनडीएला तिसऱ्यांदा विश्वास मिळणे ऐतिहासिक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली : जनतेने तिसऱ्यांदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर (एनडीए) विश्वास दाखवण्याची बाब ऐतिहासिक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचे आभार मानले आहेत.

लोकसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. एनडीएला मिळालेला विजय ही ऐतिहासिक बाब आहे, असे ते म्हणाले.

जनता-जनार्दनाला मी नमस्कार करतो. जनतेच्या आशा व आकांक्षा पूर्ण करण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेली कामे सुरूच ठेवली जातील. या निवडणुकीत मेहनत करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना मी सलाम करतो, असे ते म्हणाले. ओदिशामध्ये भाजपला मिळालेल्या जोरदार विजयाबाबत त्यांनी जनतेचे आभार मानले. जनतेचे स्वप्न पूर्ण करण्याचे व ओदिशाची प्रगती करण्यासाठी कठोर मेहनत घेतली जाईल. भाजपच्या सर्व मेहनती कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांबद्दल मला अभिमान राहील, असे ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in