"गहलोत यांनी आधीच पराभव मान्य केलाय", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गहलोल सरकारवर निशाणा

गहलोत यांच्या जनहिताची कोणतीही योजना भाजपा रोखणार नाही, असा शब्द देखील मोदींनी यावेळी दिला.
"गहलोत यांनी आधीच पराभव मान्य केलाय", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गहलोल सरकारवर निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानमध्ये जाहीर सभा घेत तेथील राज्य सरकारवर चांगलाचं हल्लाबोल केला. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यावर देखील नरेंद्र मोदी यांनी निशाणा साधला. काँग्रेसची सत्तेबाहेर पडण्याची उलटी गिनती सुरु झाली असल्याचं विधान नरेंद्र मोदी यांनी केलं. दिल्लीतील काँग्रेस नेत्यांना याबाबत कदाचित माहिती नसले, परंतु अशोक गहलोत यांना कल्पना असल्याचा दावा मोदी यांनी यावेळी केला.

भाजप सरकार आल्यानंतर काँग्रेसच्या योजना बंद करु नयेत. अशी विनंती गहलोत यांनी केली. त्यांमुळे त्यांनी आधीच पराभव स्वीकारला, त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो असा टोला मोदी यांनी यावेळी लगावला. त्याच बरोबर गहलोत यांच्या जनहिताची कोणतीही योजना भाजपा रोखणार नाही याची मी खात्री देतो. हा माझा शब्द आहे, असं देखील मोदी म्हणाले.

यावेळी बोलतामा पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज मी राजस्थानातील प्रत्येक गरीब, दलित, मागास आणि आदिवासी कुटुंबाला आणखी एक हमी देत आहे की, मोदी प्रत्येक गरीबाला घर देणार आहे. आतापर्यंत चार कोटी घरे बांधली गेली आहेत. बाकी राहिलेल्यांवर काम सुरु आहे. तुमचही घर बांधलं जाईल, असं आश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं.

ते म्हणाले की, काँग्रेस सरकारला वोट बँकेची चिंता आहे. काँग्रेसने राजस्थानमध्ये असं वातावरण तयार केलं आहे. जिथे सर्वसामान्यांना जीवाची चिंता आहे. व्यावसायिकांना व्यावसायाची चिंता आहे. विकासविरोधी वातावरण बदललं पाहिजे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

राजस्थान येथील जाहीर सभेत बोलताना मोदी म्हणाले की, राजस्थान मोठ्या आत्मविश्वासाने सांगत आहे की, भाजपा येईल, गुंडगिरी जाईल, भाजपा येणार दंगली थांबवणार, भाजपा येईल आणि दगडफेक थांबवेल, भाजपा येईल बेईमानी थांबेल, भाजपा येणार महिला सुरक्षा आणणार, भाजपा येणार रोजगार आणणार भाजपा येईल, राजस्थान समृद्ध करेल. असं मोदी म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in