शाळकरी मुलींनी बांधली पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी ; फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी, म्हणजेच 7 लोक कल्याण मार्गावर हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला.
शाळकरी मुलींनी बांधली पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी ; फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा

आज ३० ऑगस्ट रोजी देशभरात सगळीकडे रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. या निमित्तमाने सर्वत्र आनंदाचं वातावरण निर्माण झाले आहे. जसं की आपल्याया माहिती आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रत्येक वर्षी रक्षाबंधनाचा सण जोरदार साजरा करत असतात. गेल्यावर्षी देखील त्यांनी हा सण साजरा केला होता. तर यंदाच्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हा सण साजरा केला आहे. पंतप्रधानांना काही शाळकरी मुलींनी आज राख्या बांधून हा सण साजरा केला आहे. दिल्लीत हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला.

या प्रसंगाचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. काही शाळकरी मुलीं येऊन पंतप्रधान मोदी यांना राखी बांधत आहेत. यावेळी मोदींनी या मुलींशी संवाद देखील साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी, म्हणजेच 7 लोक कल्याण मार्गावर हा कार्यक्रम पार पडला आहे. याठिकाणी विविध शाळेच्या मुली उपस्थित होत्या. या सर्वांनी पंतप्रधान मोदींना राखी बांधली. त्यानंतर पंतप्रधानांनी या मुलींसोबत ग्रुप फोटो काढला.

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी ट्विट करत देशातील नागरिकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "माझ्या सर्व कुटुंबीयांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. बहीण आणि भावामध्ये असणारा अतूट विश्वास आणि अगाध प्रेमाला समर्पीत रक्षाबंधनाचा पवित्र सण हे आपल्या संस्कृतीचं प्रतिबिंब आहे. हा सण प्रत्येकाच्या जीवनात स्नेह, सद्भाव आणि सौहार्दाची भावना अधिक दाट करेल, अशी माझी इच्छा आहे", असं पंतप्रधान मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in