पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिनी जगातील सर्वात मोठे रक्तदान शिबीर

अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषदेने हे भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले आहे.
 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिनी जगातील 
सर्वात मोठे रक्तदान शिबीर
Published on

जगातील सर्वात मोठी रक्तदान मोहीम १७ सप्टेंबरला देशभरात सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिनी तीन लाख युनिट रक्त गोळा करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ही शिबिरे संपूर्ण देशात घेतली जाणार आहेत.

अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषदेने हे भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. या परिषदेचे अध्यक्ष पंकज डागा म्हणाले की, “संपूर्ण देशात एक हजार रक्तदान शिबीर घेण्याचे आम्ही ठरवले आहे. या मोहिमेला राष्ट्रीय आरोग्य मिशनचा विशेष पाठिंबा लाभला आहे. आमच्या संस्थेच्या ३५५ शाखा आहेत. या शाखांद्वारे देशाच्या विविध भागांत रक्तदान शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. त्यात तीन लाख युनिट रक्त गोळा करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त चांगल्या कामासाठी लोकांना प्रेरित करण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे.”या मोहिमेला पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच शाहरुख खान, पी. व्ही. सिंधू, चिरंजीवी, वाणी कपूर, कृति सनोन, शिल्पा शेट्टी-कुंद्रा व आर. माधवन यांनी पाठिंबा दिला आहे. देशातील एक हजार शहरांत दोन हजार रक्तदान शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. यात २५ हजार डॉक्टर व एक लाख स्वयंसेवक सहभागी होणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in