पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संपत्ती २.२३ कोटी; पीएमओ’द्वारे संपत्तीचा तपशील जारी

पंतप्रधान मोदी यांच्याकडे कोणतीही अचल संपत्ती नाही. त्यांनी गांधीनगर येथील आपल्या हिश्शाची जमीन दान केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संपत्ती २.२३ कोटी; पीएमओ’द्वारे संपत्तीचा तपशील जारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संपत्ती एका वर्षात २६ लाख रुपयांनी वाढली आहे. पंतप्रधानांची संपत्ती २.२३ कोटी असून हे पैसे बहुतांशी बँकेत आहेत. ‘पीएमओ’द्वारे पंतप्रधान मोदी यांच्या संपत्तीचा तपशील जारी करण्यात आला आहे.

पंतप्रधान मोदी यांच्याकडे कोणतीही अचल संपत्ती नाही. त्यांनी गांधीनगर येथील आपल्या हिश्शाची जमीन दान केली आहे. तिची किंमत एक कोटी रुपये आहे.

वर्षभरात २६.१३ लाखांची वाढ; एक कोटीची जमीन दान

‘पीएमओ’ने वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, मोदी यांचे रोखे, शेअर बाजार व म्युच्युअल फंडात कोणतीही गुंतवणूक नाही. त्यांच्याकडे सोन्याच्या चार अंगठ्या असून त्यांची किंमत १.७३ लाख आहे. ३१ मार्च २०२२ रोजी मोदी यांची २,२३,८२,५०४ कोटी संपत्ती आहे. मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांनी जमीन खरेदी केली होती. यात आणखी तीन भागीदार होते. प्रत्येकाचा हिस्सा २५ टक्के होता. त्यातील आपल्या वाट्याची २५ टक्के जमीन पंतप्रधानांनी दान केली.

logo
marathi.freepressjournal.in