पंतप्रधान घेणार पीडित महिलांची भेट

. संदेशखालीतील महिलांनी तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शाहजहान शेख आणि त्यांच्या समर्थकांवर जमीन हडपण्याचा आणि लैंगिक छळाचा आरोप केला
पंतप्रधान घेणार पीडित महिलांची भेट

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील संदेशखालीतील पीडित महिलांचे प्रकरण देशात गाजत आहे. या प्रकरणी आरोपींवर कारवाईची मागणी भाजपसह राज्यातील विरोधी पक्ष ममता सरकारला सातत्याने लक्ष्य करत आहे. आता ६ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगाल दौऱ्यावर आहेत. यावेळी ते संदेशखालीतील पीडितांची भेटही घेणार आहेत. संदेशखालीतील महिलांनी तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शाहजहान शेख आणि त्यांच्या समर्थकांवर जमीन हडपण्याचा आणि लैंगिक छळाचा आरोप केला आहे. संदेशखालीप्रकरणी भाजप, काँग्रेस आणि डाव्यांचे अनेक नेते घटनास्थळी भेट देण्याचा प्रयत्न करत होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in