बिहारमध्ये कैद्याची न्यायालयाबाहेर हत्या

या कैद्यावर हत्येसहित अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
बिहारमध्ये कैद्याची न्यायालयाबाहेर हत्या

पाटणा : राजधानी पाटणा येथे भरदिवसा एका कैद्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. दानापूर कोर्टाच्या परिसरात कैद्याला हजर करायला नेले जात असताना हा प्रकार घडला.

मृत कैद्याचे नाव अभिषेक कुमार ऊर्फ छोटे सरकार आहे. या कैद्यावर हत्येसहित अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीस अधीक्षक राजेश कुमार म्हणाले की, २ हल्लेखोरांनी गोळ्या चालवल्या. त्यांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींची चौकशी सुरू केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in