
नवी दिल्ली : खरा भारतीय कोण आहे हे सर्वोच्च न्यायालय ठरवू शकत नाही, असे म्हणत खासदार प्रियांका गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या बचावासाठी पुढे सरसावल्या आहेत. सरकारला प्रश्न विचारणे ही राहुल गांधींची जबाबदारी आहे, कारण ते लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. कोणीही खरा हिंदुस्थानी असे विधान करू शकत नाही, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली होती. त्यावर प्रियाका गांधी यांनी हे मत व्यक्त केले आहे.
प्रियांका गांधी म्हणाल्या की, न्यायमूर्तींचा संपूर्ण सन्मान ठेवून मी एवढेच सांगू इच्छिते की खरा भारतीय कोण आहे हे ठरवण्याचा अधिकार त्यांना नाही. सरकारला प्रश्न विचारणे हे विरोधी पक्षनेत्याचे कर्तव्य आहे. राहुल गांधी कधीही सैन्याविरोधात बोलणार नाहीत. त्याला सैन्याबद्दल प्रचंड आदर आहे. त्याच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे, असे प्रियांका गांधी म्हणाल्या.