'सरकारने आपला हट्टीपणा सोडावा'; लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीस प्रियांका गांधी यांचा पाठिंबा
(संग्रहित छायाचित्र)

'सरकारने आपला हट्टीपणा सोडावा'; लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीस प्रियांका गांधी यांचा पाठिंबा

लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीला काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वढेरा यांनी बुधवारी पाठिंबा दर्शवला.

नवी दिल्ली : लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीला काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वढेरा यांनी बुधवारी पाठिंबा दर्शवला. या संबंधात सरकारने आपला हट्टीपणा सोडून लोकांचा आवाज ऐकला पाहिजे, अशीही मागणी त्यांनी केली.

काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वढेरा यांनी लडाखचे लोक पूर्ण राज्याच्या मागणीसाठी आठ दिवस उपोषण करत असल्याचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

भाजपने लडाखच्या जनतेला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु ते पूर्ण केले नाही. एकीकडे चीनने आक्रमक धोरण स्वीकारले आहे. दुसऱ्याबाजूला मात्र सारे गप्प आहेत. भाजप सरकारची आश्वासने आणि विश्वासघात यामुळे लडाखच्या लोकांच्या विश्वासाला तडा जात आहे. वारंवार होणाऱ्या निषेधादरम्यान, लडाखचे शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि अनेक जण उणे १५ अंश तापमानात आठ दिवसांपासून उपोषण करत आहेत, असे प्रियंका वढेरा यांनी पोस्ट केले आहे.

प्रियांका म्हणाल्या की, लडाखचे लोक सहाव्या अनुसूची अंतर्गत पूर्ण राज्याचा दर्जा आणि सुरक्षेची मागणी करत आहेत, जी पूर्ण करणे सरकारचे कर्तव्य आहे. त्यासाठीच आता सरकारने आपला ‘हट्टीपणा’ सोडून लडाखच्या लोकांचा आवाज ऐकावा, अशी मागणीही प्रियंका गांधी वढेरा यांनी केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in