प्रियंका गांधी-वड्रा रुग्णालयात

. भारत जोडो न्याय यात्रेची उत्तर प्रदेशात पोहोचण्याची मी आतुरतेने वाट पाहत होते, पण मला आजच रुग्णालयात दाखल करावे लागले
प्रियंका गांधी-वड्रा रुग्णालयात

नवी दिल्ली : आजारपणामुळे रुग्णालयात दाखल झाल्याने भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होता येणार नसल्याचे काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वड्रा यांनी सांगितले. या यात्रेसाठी आपले बंधू राहुल गांधी यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या असून आपण प्रकृती ठीक झाल्यानंतर यात्रेत सहभागी होऊ, असेही एक्सवर स्पष्ट केले आहे. बिहारमधून यात्रा राज्यात दाखल झाल्यानंतर प्रियंका गांधी-वड्रा उत्तर प्रदेशातील चंदौली येथे आपल्या भावासोबत जाणार होत्या, अशी माहिती सूत्रांनी दिली. भारत जोडो न्याय यात्रेची उत्तर प्रदेशात पोहोचण्याची मी आतुरतेने वाट पाहत होते, पण मला आजच रुग्णालयात दाखल करावे लागले, असे त्यांनी म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in