राहुल गांधींना शिक्षा सुनावल्यानंतर प्रियांका गांधींचे मोठे विधान

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना मानहाणीप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर त्यांची बहीण प्रियांका गांधी वाडरा यांनी आपली प्रतिक्रिया दिली
राहुल गांधींना शिक्षा सुनावल्यानंतर प्रियांका गांधींचे मोठे विधान

आज सुरत सत्र न्यायालयाने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना मानहानी प्रकरणी २ वर्षांची शिक्षा सुनावली. यावरून आता त्यांची बहीण प्रियांका गांधी यांनी प्रतिक्रिया ट्विट केली आहे. त्या म्हणाल्या की, "घाबरलेल्या सत्ताधाऱ्यांकडून राहुल गांधींचा आवाज दाबण्यासाठी साम, दाम, दंड, भेदचा वापर करण्यात येतो आहे. असे असले तरी माझा भाऊ ना कधी घराला आहे, ना कधी घाबरणार आहे." असे ट्विट केले आहे.

प्रियांका गांधी यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, "घाबरलेल्या सत्ताधाऱ्यांकडून राहुल गांधींना घाबरवण्याचा प्रयत्न होत आहे. यासाठी साम, दाम, दंड, भेदाचा वापर करण्यात येत आहे. असे असले तरी माझा भाऊ ना कधी घाबरला आहे, ना कधी घाबरणार आहे. सत्य बोलण्यासाठी जगतो आणि कायम सत्य बोलतच राहू, देशासाठी आम्ही आवाज उठवत राहू, सत्याची ताकद आणि करोडो भारतीयांचे आशीर्वाद त्याच्या सोबत आहे."

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in