दिल्ली मेट्रो स्थानकांच्या भिंतींवर खलिस्तान समर्थनार्थ घोषणा ; G20 परिषदेपूर्वी देशाला बदनाम करण्याचा प्रयत्न

शीख फॉर जस्टीस दहशतवादी संघटनेशी संबंधित लोकांनी मेट्रो स्टेशनच्या भिंतींवर खलिस्तान जिंदाबाद आणि पंजाब इज नॉट इंडियाच्या घोषणा लिहिलेलं स्लोगन चिटकवलं आहे.
दिल्ली मेट्रो स्थानकांच्या भिंतींवर खलिस्तान समर्थनार्थ घोषणा ; G20 परिषदेपूर्वी देशाला बदनाम करण्याचा प्रयत्न

देशाची राजधानी दिल्लीत आगामी काळात होणाऱ्या G20 परिषदेपूर्वी देशाला बदनाम करण्याचा प्रयत्न काही समाज कंटकांनी केला आहे. दिल्लीतील पाच मेट्रो स्थनकांवर 'दिल्ली बनेगा खलिस्तान' आणि 'खलिस्तान जिंदाबाद' चे स्लोगन लावण्यात आले. दिल्ली पोलीसांकडून याप्रकरणी कारवाई सुरु करण्यात आली आहे. G20 परिषदेपूर्वी शीख फॉर जस्टिस(SFJ) या संघटनेने हे घडवून आणलं आहे. दिल्ली मेट्रो स्थानकांचे फुटेजही त्यांनी जारी केले आहेत.

शीख फॉर जस्टीस(SFJ) या दहशतवादी संघटनेशी संबंधित लोकांनी मेट्रो स्टेशनच्या भिंतींवर खलिस्तान जिंदाबाद आणि पंजाब इज नॉट इंडियाच्या घोषणा लिहिलेलं स्लोगन चिटकवलं. खलिस्तान समर्थक लोकांनी शिवाजी पार्क, मादीपूर, पश्चिम विहार, इंडस्ट्री सिटी, महाराजा सूरजमल स्टेडियम, सरकारी सर्वोदय बाल विद्यालय नांगलोई, पंजाबी बाग आणि नांगलोई मेट्रो स्टेशनवर या घोषणा लिहण्यात आल्या आहेत.

दिल्ली पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी जात ठिकठिकाणी चिटकवलेल्या घोषणा हटवल्या आहेत. तसंच याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं मेट्रो पोलिसांचं म्हणणं आहे. याकामासाठी दिल्ली पोलिसांचे स्पेशल सेलदेखील सक्रिय झालं आहे. याप्रकरणी मेट्रो स्थानकांवरचे सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले जात आहेत.ही घटना घडल्यानंतर शीख फॉर जस्टिसचा फरार दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूने एक व्हिडिओ जारी केला आहे, ज्यात अनेक मेट्रो स्थानकांच्या भींतीवर नारे लिहिलेल दिसत आहे.

काय आहे शिख फॉर जस्टिस संघटना?

शीख फॉर जस्टिस ही संघटना २००७ मध्ये सुरु झाली असून या संघटनेचे प्रमुख हे अमेरिकेत राहतात. पंजाब राज्याला खलिस्तान नावाचा वेगळा देश बनवणे, या या संघटनेचा मुख्य उद्धेश आहे. पंजाब विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतलेला आमि सध्या अमेरिकेत वकील असलेला गुरपतवंद सिंग पन्नू हा या संघटनेचा प्रमुख आहे.गुरपतंत सिंगने प्रजासत्ताक दिनापूर्वी हिंसाचार घडवून आणण्याची धमकी दिली होती.केंद्रीय गृहमंत्रालयाने २०१९ साली शीख फॉर जस्टिस या संघटनेवर बंदी घातली होती. मात्र, तरी देखील कुठल्या ना कुठल्या मार्गाने ही संघटना देशात देशविरोधी कारवाया करत असते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in