आयकर पोर्टलमध्ये करदात्यांना आल्या अडचणी

सॉफ्टवेअर प्रदाता इन्फोसिस करदात्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तयार आहे आणि आवश्यक पावले उचलत आहे
आयकर पोर्टलमध्ये करदात्यांना आल्या अडचणी
Published on

आयकराचे ई-फायलिंग पोर्टल वापरणाऱ्या करदात्यांना सध्या त्रास होत आहे. आता या संदर्भात आयकर विभागाकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. शनिवारी आयकर विभागाने सांगितले की, सॉफ्टवेअर प्रदाता इन्फोसिस करदात्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तयार आहे आणि आवश्यक पावले उचलत आहे.

आयकर विभागाने केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, आयटीआर ई-फायलिंग पोर्टल वापरण्यात करदात्यांना अडचणी येत असल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणात, सॉफ्टवेअर प्रदाता इन्फोसिसने म्हटले आहे की साइटवर अनियमित रहदारीचा दबाव दिसत आहे, त्यास सामोरे जाण्यासाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत.

नवीन आयकर www.incometax.gov.in चे नवीन ई-फायलिंग पोर्टल ७ जून २०२१ रोजी लाँच करण्यात आले. त्यावेळीही करदात्यांनी आणि व्यावसायिकांनी त्याच्या कामकाजात अनियमितता आणि अडचणी असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. हे पोर्टल तयार करण्याचे कंत्राट इन्फोसिसला २०१९ मध्ये देण्यात आले होते. आयकर विभागाचे नवीन ई-फायलिंग पोर्टल स्थापित करण्यासाठी सरकारने इन्फोसिसला १६४.५ कोटी रुपये दिले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in