पंजाब नॅशनल बँकेला कोटी रुपयांचा नफा; पहिल्या तिमाहीत बँकेला २१२९४ कोटी रुपये महसूल प्राप्त

बुडित कर्जासाठी मोठी तरतुद करावी लागल्याने आणि व्याजातून मिळणारा नफा कमी झाल्याने बँकेचा नफा कमी झाला आहे
पंजाब नॅशनल बँकेला कोटी रुपयांचा नफा; पहिल्या तिमाहीत बँकेला २१२९४ कोटी रुपये महसूल प्राप्त
Published on

सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेच्या नफ्यात जूनमध्ये संपलेल्या पहिल्या तिमाहीत ७० टक्के घट झाली आहे. बँकेला ३०८.४४ कोटी रुपये नफा मिळाला आहे. बुडित कर्जासाठी मोठी तरतुद करावी लागल्याने आणि व्याजातून मिळणारा नफा कमी झाल्याने बँकेचा नफा कमी झाला आहे. गेल्यावर्षी बँकेला याच काळात १०२३.४६ कोटी रुपयांचा नफा झाला होता.

यंदाच्या पहिल्या तिमाहीत बँकेला २१२९४ कोटी रुपये महसूल मिळाला. गेल्यावर्षी बँकेला याच काळात २२५१५ कोटी रुपये महसूल मिळाला होता. तसेच बँकेला व्याजातून मिळणारे उत्पन्न जून रोजी संपलेल्या तिमाहीत १८७५७ कोटी मिळाले. गेल्यावर्षी याच काळात हेच उत्पन्न १८९२१ कोटी रुपये होते. बँकेचे घाऊक बुडित कर्जाचे प्रमाण ११.२ टक्क्यांवर आले. गेल्यावर्षी हेच प्रमाण १४.३३ टक्के होते. मार्च २०२२ रोजी हेच प्रमाण ११.७८ टक्के होते. २०२२-२३ आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत बुडीत कर्जाचे प्रमाण ९०१६७.१० कोटी होते. गेल्यावर्षी हेच प्रमाण १,०४,०७५.५६ कोटी होते. तर बँकेचे निव्वळ बुडित कर्ज यंदाच्या पहिल्या आर्थिक तिमाहीत ४.२६ टक्के होते. गेल्यावर्षी हेच प्रमाण५.८४ टक्के होते.

गेल्या दोन वर्षात कोविड-१९ चा मोठा परिणाम देशाच्या व परदेशातील अर्थव्यवस्थेला बसला. मात्र, तरीही बँकेच्या ताळेबंदाला, कामावर कोणताही परिणाम झाला नाही, असे बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in