नवी दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर आंदोलन ; निषेधाच्या ठिकाणी कलम 144 लागू

ब्रिजभूषण शरण सिंग यांनी भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा आणि त्यांना अटक करावी, अशी मागणी कुस्तीपटूंकडून होत आहे
नवी दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर आंदोलन ; निषेधाच्या ठिकाणी कलम 144 लागू

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात नवी दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर आंदोलन करण्यात येत आहे. देशातील प्रसिद्ध कुस्तीपटूंनी ही चळवळ सुरू केली आहे. ब्रिजभूषण शरण सिंग यांनी भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा आणि त्यांना अटक करावी, अशी मागणी कुस्तीपटूंकडून होत आहे. या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही आमची पदके परत करू, असा पवित्रा या कुस्तीपटूंनी घेतला आहे. कारवाई करावी अन्यथा आम्ही आमची पदके परत करू, असे या आंदोलनात सहभागी झालेल्या विनेश फोगट यांनी सांगितले.


भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात जंतर-मंतरवर आंदोलन सुरू आहे. हा जंतर-मंतर परिसर सध्या निर्मनुष्य आहे. जंतर-मंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी बॅरिकेडिंग लावून सर्व रस्ते बंद केले आहेत. मीडियाच्या ओबी व्हॅन आणि कारही एक किलोमीटरवर हलवण्यात आल्या आहेत. निषेधाच्या ठिकाणी कलम 144 लागू करण्यात आले आहे. कालच्या मध्यरात्री रॅलीनंतर दिल्ली पोलीस अलर्ट मोडवर आहेत. सुप्रीम कोर्टात याचिकेवर सुनावणी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. 

ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या अटकेच्या मागणीसाठी महिला कुस्तीगीर निदर्शने करत आहेत. बृजभूषण यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर दिल्लीतील कॅनॉट प्लेस पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अल्पवयीन मुलीचे शोषण केल्याप्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 6 महिला कुस्तीपटूंच्या शोषणप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ब्रिजभूषण शरणसिंग यांना अद्याप अटक झालेली नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in