File Photo
File PhotoANI

जामा मशिदीबाहेर नुपूर शर्माच्या विरोधात निदर्शने, अटकेची मागणी

जामा मशिदीबाहेर मोठा जमाव जमला. मात्र, पोलीसही घटनास्थळी तैनात असून लोकांना...
Published on

प्रेषित मोहम्मद यांच्यावर कथित टिप्पणी केल्याप्रकरणी भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या अटकेवरून दिल्लीतील जामा मशिदीबाहेर निदर्शने सुरू आहेत. शुक्रवारच्या नमाजानंतर लोकांनी जामा मशिदीबाहेर निदर्शने करत नुपूर शर्मा आणि इतरांच्या अटकेची मागणी केली. यावेळी जामा मशिदीबाहेर मोठा जमाव जमला. मात्र, पोलीसही घटनास्थळी तैनात असून लोकांना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत.

एएनआयनुसार, दिल्ली पोलिसांनी सांगितले की, भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा आणि भाजप नेते नवीन कुमार जिंदाल यांच्या वक्तव्याविरोधात लोकांनी जामा मशिदीत निदर्शने केली. आम्ही लोकांना तेथून हटवले असून परिस्थिती आता नियंत्रणात आहे.

काय आहे प्रकरण ?

ज्ञानवापी मशिदीच्या आवारात सापडलेल्या शिवलिंगाच्या मुद्द्यावर एका टीव्ही चर्चेदरम्यान नुपूर शर्माने पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीका तर झालीच पण भाजपने त्यांना पक्षातून निलंबित केले. मात्र, या वक्तव्यानंतर नुपूर शर्माला जीवे मारण्याच्या धमक्याही आल्या, ज्याची पोलिसांत तक्रार करण्यात आली आणि एफआयआर नोंदवल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांना सुरक्षा पुरवली.

logo
marathi.freepressjournal.in