ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात पूजा सुरूच राहणार; अलाहाबाद न्यायालयाने याचिका फेटाळली

या तळघरात हिंदूंना पूजा करण्याची परवानगी देणारा आदेश ३१ जानेवारी रोजी दिला होता.
ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात पूजा सुरूच राहणार; अलाहाबाद न्यायालयाने याचिका फेटाळली

प्रयागराज : वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात पूजेला परवानगी देणाऱ्या वाराणसी न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे मशिदीच्या तळघरात यापुढेही पूजाअर्चा सुरूच राहणार आहे.

काशी विश्वनाथ मंदिराला लागून असलेल्या ज्ञानवापी मशिदीच्या 'व्यास तहखाना' नावाने ओळखल्या जाणाऱ्या तळघरासाठी जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांना रिसिव्हर म्हणून नेमण्याचा आदेश वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाने १७ जानेवारी रोजी दिला होता. तसेच या तळघरात हिंदूंना पूजा करण्याची परवानगी देणारा आदेश ३१ जानेवारी रोजी दिला होता. वाराणसी न्यायालयाच्या या दोन आदेशांना आव्हान देणारी याचिका मशिदीच्या मुस्लीम व्यवस्थापनाने अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल केली होती. न्या. रोहित रंजन अग्रवाल यांनी सोमवारी ही याचिका फेटाळून लागली आणि मशिदीच्या तळघरात हिंदूंची पूजा सुरूच राहील, असे स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in