पंजाबचे CM भगवंत मान दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार: पहिल्या पत्नीशी झाला घटस्फोट

पहिल्या पत्नीपासून त्यांना 2 मुले आहेत. तेही आपल्या आईसमवेत अमेरिकेत राहतात, मान यांच्या शपथविधीसाठी ते मायदेशी आले होते.
पंजाबचे CM भगवंत मान दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार: पहिल्या पत्नीशी झाला घटस्फोट
ANI
Published on

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान गुरूवारी दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहेत. त्यांचे लग्न चंदिगड स्थित सीएम हाऊसमध्ये होईल. डॉक्टर गुरप्रीत कौर असे त्यांच्या नियोजित वधूचे नाव आहे.

भगवंत मान यांचे हे दुसरे लग्न आहे. त्यांचा 2015 मध्ये घटस्फोट झाला होता. त्यानंतर त्यांची पत्नी अमेरिकेला गेली, पहिल्या पत्नीपासून त्यांना 2 मुले आहेत. तेही आपल्या आईसमवेत अमेरिकेत राहतात. ते मान यांच्या शपथविधीसाठी मायदेशी आले होते.

पहिली पत्नी राजकारणातील प्रवेशाने होत्या नाराज

भगवंत मान यांची पहिली पत्नी त्यांच्या राजकारणातील प्रवेशामुळे नाराज होत्या. मान यांनी प्रथम पंजाब पीपल्स पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढली. त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर ते आम आदमी पार्टीत सहभागी झाले. 2014 मध्ये ते संगरूर लोकसभा मतदार संघातून मैदानात उतरले. त्यानंतर पती-पत्नीत वाद निर्माण झाला. याची परिणिती 2015 मधील त्यांच्या घटस्फोटात झाली.

सूत्रांच्या माहितीनुसार, भगवंत मान एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलीशी लग्न करत आहेत. खासदार राघव चड्ढा या लग्न सोहळ्याचे व्यवस्थापन पाहत आहेत. या सोहळ्याला आप सुप्रीमो अरविंद केजरीवाल व दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह अनेक व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in