पंजाबमध्ये ८ मनरेगा मजूर ठार; भरधाव कारची धडक

पंजाबमधील संगरूर जिल्ह्यात रस्त्यावर काम करणाऱ्या मजुरांना भरधाव कारने धडक दिल्याने आठ मनरेगा मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात अनेक मजूर गंभीर जखमी झाले आहेत.
पंजाबमध्ये ८ मनरेगा मजूर ठार; भरधाव कारची धडक
पंजाबमध्ये ८ मनरेगा मजूर ठार; भरधाव कारची धडक
Published on: 

संगरूर : पंजाबमधील संगरूर जिल्ह्यात रस्त्यावर काम करणाऱ्या मजुरांना भरधाव कारने धडक दिल्याने आठ मनरेगा मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात अनेक मजूर गंभीर जखमी झाले आहेत.

लेहरागागा-जाखल मार्गावर सुमारे २३ मजूर काम करत असताना भरधाव कारने त्यांना धडक दिली. त्यानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. जखमी मजुरांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर पोलिसांची मदत आणि रुग्णवाहिकांच्या उपलब्धतेबाबत स्थानिक नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले.

रायधराणा येथील परगतसिंग काला हा तरुण कार चालवत होता. कर्मजीत कौर, जीवनसिंग, निक्की, सरबजीत कौर, रणजीत कौर, कर्मजीत, राणी कौर आणि देस राज अशी मृतांची नावे आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in