Punjabi Singer arrested : मानवी तस्करीच्या गुन्ह्यांतर्गत दिलेर मेहंदी अटकेत ; वाचा नेमकं प्रकरणं 

या खटल्याची सुनावणी आजपासून पंधरा वर्षांपूर्वी झाली. पटियाला कोर्टाने या प्रकरणात दलेर मेहंदीला दोषी ठरवले आहे. या प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर न्यायालयाने आज त्याला अटक केली.
Punjabi Singer arrested : मानवी तस्करीच्या गुन्ह्यांतर्गत दिलेर मेहंदी अटकेत ; वाचा नेमकं प्रकरणं 
Published on

पंजाबी गायक दलेर मेहंदीला अटक करण्यात आली आहे. दलेर मेहंदीला मानवी तस्करीच्या एका प्रकरणात अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला दोन वर्षांची शिक्षा सुनावली. हे प्रकरण 15 वर्षे जुने आहे. पंधरा वर्षांपूर्वी या मानवी तस्करीप्रकरणी दलेर मेहंदीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या खटल्याची सुनावणी आजपासून पंधरा वर्षांपूर्वी झाली. पटियाला कोर्टाने या प्रकरणात दलेर मेहंदीला दोषी ठरवले आहे. या प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर न्यायालयाने आज त्याला अटक केली.

काय आहे प्रकरण :

दिलर मेहंदी आपल्या विविध कार्यक्रमांसाठी परदेशात जात असे, 1998-99 मध्ये एका शोसाठी जात असताना 10 लोकांना बेकायदेशीरपणे अमेरिकेत नेल्याचा आरोप त्याच्यावर आहे. मेहंदीच्या नुसार ते दहा जण शोच्या टीमचे भाग होते. मात्र त्यांना परदेशात नेण्यासाठी त्याने पैसे घेतले होते. अशी माहिती समोर आली होती.

logo
marathi.freepressjournal.in