पुतिन यांची हत्या होऊ शकते! बाबा वंगा यांची २०२४ साठी भविष्यवाणी : जगभरात दहशतवाद फोफावेल

सायबर हल्लेखोर वीज प्रकल्पांचे जाळे आणि पाणी प्रक्रिया प्रकल्पांसारख्या अत्यावश्यक पायाभूत सुविधांना लक्ष्य करतील
पुतिन यांची हत्या होऊ शकते! बाबा वंगा यांची २०२४ साठी भविष्यवाणी : जगभरात दहशतवाद फोफावेल
Published on

नवी दिल्ली : जगाच्या राजकारण, अर्थकारण आणि मानवी अस्तित्वाचे भविष्य वर्तवणाऱ्या बल्गेरियाच्या बाबा वंगा यांनी २०२४ साठी सात धक्कादायक गोष्टी घडतील, असे भविष्य वर्तवले आहे. यात प्रामुख्याने रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची हत्या होईल, असे भविष्य बाबा वंगा यांनी वर्तवले आहे. तसेच, बाबा वंगा यांनी आपल्या भविष्यवाणीत जगभरात दहशतवाद फोफावेल असे म्हटले आहे, तर कॅन्सरसारख्या असाध्य आजारावर प्रभावी औषधाचा २०२४ या सालात शोध लागेल, असेही भविष्य बाबा वंगा यांनी वर्तवले आहे.

बाबा वंगा यांनी आजवर केलेली ८५ टक्के भविष्यवाणी खरी ठरली आहे. ‘बाल्कनच्या नॉस्ट्राडेमस’ अशी ओळख असलेल्या बाबा वंगा यांनी काही वर्षांपूर्वी अमेरिकेवर ९/११ चा दहशतवादी हल्ला आणि ब्रिटनमधील ब्रेग्झिटची भविष्यवाणी केली होती. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांची दृष्टी वादळामुळे गेली. पण, त्यानंतर लवकरच त्यांना दैवी शक्ती प्राप्त झाली, असे बोलले जाते. बल्गेरियाच्या रहिवाशी असलेल्या बाबा वंगा यांचे १९९६ साली वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. तरीही त्यांनी लिहून ठेवलेली भविष्यवाणी साऱ्या जगात चर्चेचा विषय ठरते. २०२४ सालासाठी त्यांनी वर्तवलेल्या भविष्यवाणीत सात महत्त्वाच्या घटनांचा समावेश आहे.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची २०२४ मध्ये हत्या होऊ शकते. रशियातीलच कोणीतरी त्यांची हत्या करेल, असा अंदाज बाबा वंगा यांनी व्यक्त केला आहे. क्रेमलिन यांच्या वतीने सातत्याने पुतीन यांना कॅन्सर झाल्याचे वृत्त फेटाळून लावले जात आहे. तसेच, पुतिन यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.

बाबा वंगा यांनी आपल्या भविष्यवाणीत जगभरात दहशतवाद फोफावेल, असे म्हटले आहे. तसेच, युरोपला दहशतवादाचा मोठा फटका बसणार असल्याचेही सांगितले आहे. त्यांनी म्हटले आहे की, पुढच्या वर्षी एक मोठा देश जैविक शस्त्रांची चाचणी घेईल किंवा जैविक शस्त्रांचा वापर करून हल्ला करेल. तसेच, दहशतवादी युरोपवर निशाणा साधणार असून युरोपातील विविध शहरांमध्ये ते हल्ले करतील, असा दावाही बाबा वंगा यांनी आपल्या भविष्यवाणीत व्यक्त केला आहे.

बाबा वंगा यांनी पुढल्या वर्षी नैसर्गिक आपत्ती आणि खराब हवामानाचे विपरीत परिणाम जगभर पाहायला मिळतील, असं भाकीत केलं आहे. वंगा यांच्या मते, पृथ्वीच्या कक्षेत बदल होणार आहे. हे फार कमी कालावधीसाठी होईल, परंतु त्यामुळे हवामान बदलाचे भयानक परिणाम दिसून येतील. तसेच, रेडिएशनचाही पृथ्वीला धोका असेल. २०२४ मध्ये जगाला सायबर हल्ल्याचा धोका असल्याचे बाबा वंगा यांनी म्हटले आहे. सायबर हल्लेखोर वीज प्रकल्पांचे जाळे आणि पाणी प्रक्रिया प्रकल्पांसारख्या अत्यावश्यक पायाभूत सुविधांना लक्ष्य करतील, असे बाबा वंगा यांनी म्हटले आहे. यामुळे राष्ट्रीय स्तरावर सुरक्षेला धोका निर्माण होईल, असा अंदाज बाबा वंगा यांनी व्यक्त केला आहे.

बाबा वंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, वैद्यकीय क्षेत्राला मात्र दिलासा देणारी बातमी आहे. अल्झायमरसह कॅन्सरसारख्या आजारांवर नवे उपचार उपलब्ध होतील, तसेच कॅन्सरवर प्रभावी उपचार होतील, असा अंदाजही बाबा वंगा यांनी व्यक्त केला आहे. पुढील वर्षी क्वांटम कंप्युटिंगमध्ये मोठा शोध लागेल, असा अंदाज बाबा वंगा यांनी वर्तवला आहे. क्वांटम कंप्युटिंग वेगानं विकसित होत आहे. याद्वारे सामान्य कॉम्प्युटर वापरण्यापेक्षा जलदगतीनं समस्या सोडवता येऊ शकतात, असे वंगा यांनी म्हटले आहे. असा शोध लागल्यास पुढील वर्षी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढेल.

जगाला आर्थिक संकटाचा धोका

बाबा वंगा यांनी जगाची अर्थव्यवस्था कोलमडू शकते, असा मोठा दावा केला आहे. कर्जाची पातळी, भू-राजकीय तणाव आणि आर्थिक शक्तींचे पश्चिमेकडून पूर्वेकडे स्थलांतर ही त्यासाठी कारणं सांगण्यात आली आहेत.

logo
marathi.freepressjournal.in