पुतीन यांनी अलास्का चर्चेची मोदींना दिली माहिती

अलास्कात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या चर्चेची माहिती रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनीद्वारे दिली. यावेळी रशिया-युक्रेन संघर्ष शांततेने सोडवण्यात यावा, या भूमिकेचा भारताने पुनरुच्चार केला.
पुतीन यांनी अलास्का चर्चेची मोदींना दिली माहिती
Published on

नवी दिल्ली : अलास्कात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या चर्चेची माहिती रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनीद्वारे दिली. यावेळी रशिया-युक्रेन संघर्ष शांततेने सोडवण्यात यावा, या भूमिकेचा भारताने पुनरुच्चार केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोमवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी दूरध्वनी केला. शुक्रवारी ट्रम्प आणि पुतीन यांची अलास्कात भेट झाली. मात्र, या शिखर परिषदेत युद्धविरामाबाबत प्रगती होऊ शकली नाही.

पुतीन यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मोदी म्हणाले की, भारताने कायमच रशिया-युक्रेन संघर्षाच्या शांततामय तोडग्यासाठी आवाहन केले असून अशा सर्व प्रयत्नांना पाठिंबा दिला आहे.

"माझे मित्र राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी फोनद्वारे अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या बैठकीबाबतची माहिती दिल्याबद्दल त्यांचे आभार," असे पंतप्रधानांनी सोशल मीडियावर म्हटले आहे.

पंतप्रधान कार्यालयाने सांगितले की, पुतीन यांनी ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या बैठकीची माहिती मोदींना दिली. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय सहकार्याशी संबंधित विविध विषयांवरही चर्चा केली. ज्यामुळे भारत-रशिया रणनीतिक भागीदारी अधिक बळकट होईल, असे 'पीएमओ'ने सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in