
तिहार तुरुंगात १९ दिवसांत गँगवॉरमध्ये दोघांचा बळी गेल्यानंतर तिहार तुरुंग प्रशासनाला जाग आली आहे. आता तुरुंगातील अतिसंवेदनशील बॅरकबाहेर क्वीक रिस्पॉन्स टीम (क्यूआरटी) तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. या क्यूआरटीत तामिळनाडू स्पेशल पोलीस, सीआरपीएफचे जवान तैनात असतील. त्यांच्याकडे दंगलविरोधी सामुग्री असेल. त्यात हेल्मेट, बुलेटप्रूफ जॅकेट, चिल्ली पावडर, मात्र त्यांच्याकडे हत्यार नसतील. तुरुंगाच्याबाहेर आयटीबीपीचे जवान तैनात असतील.
गँगस्टर टिल्लू ताजपुरिया हत्याप्रकरणी तिहारमधील आठ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. भविष्यात या घटना रोखण्यासाठी क्यूआरटी नेमल्या आहेत. तुरुंगातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ताजपुरिया याच्या हत्येच्यावेळी आपत्कालिन परिस्थितीत सायरन बंद पडला होता. तो का बंद पडला होता त्याची चौकशी सुरू केली आहे.
अतिधोकादायक बॅरेकबाहेर हे क्यूआरटी पथक तैनात केले जाईल. कैद्यांमध्ये मारामारी झाल्यास तात्काळ त्याला तात्काळ प्रत्युत्तर दिले जाणार आहे.