जमीनीखालील काळा पैसा शोधण्यासाठी रडार तैनात ;साहू यांच्या घरात जमीनीखाली तपास होणार

या रडारला लॅपटॉपसारखा स्क्रीन आहे. साहू यांचे एकत्र कुटुंबाचे मोठे घर आहे. सीआयएसएफचे जवान आता तेथे पहारा देत आहेत.
जमीनीखालील काळा पैसा शोधण्यासाठी रडार तैनात ;साहू यांच्या घरात जमीनीखाली तपास होणार
PM

रांची: ओडिशा मधील कॉंग्रेस खासदर धीरज साहू यांच्या घरातील जमीनीखाली लपवलेला काळा पैसा शोधून काढण्यासाठी आयकर विभागाने गाउंड स्कॅनिंग रडारच तैनात केले आहे. साहू यांच्या घरातून आयकर विभागाने या आधी ३५१ कोटी रुपये रोख जप्त केली आहे. पण साहू यांनी जमीनीखाली आणखी संपत्ती लपवून ठेवली असल्याचा संशय आयकर विभागाला आहे. यामुळे आयकर विभागाने मंगळवारी चक्क जमीनीखालील संपत्ती शोधणारे रडारच येथे आणले आहे.

या रडारला लॅपटॉपसारखा स्क्रीन आहे. साहू यांचे एकत्र कुटुंबाचे मोठे घर आहे. सीआयएसएफचे जवान आता तेथे पहारा देत आहेत. वरवरच्या शोधमोहिमेत काही न सापडल्यामुळे आता जमीनीखालील संपत्तीचा शोध घेण्यात येणार आहे. आयकर विभागाने आजातागायतची सर्वात मोठी रक्कम येथे जप्त केली आहे. साहू कुटुंबांने मात्र अजूनही या बाबत कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण दिलेले नाही. साहू कुटुंबाने स्थापन केलेली बौध डिस्टीलरी ही मद्य उत्पादक कंपनी असून मुख्यालय भुवनेश्वर येथे आहे. आयकर विभागाने ही कंपनी आणि साहू कुटुंब यांच्याशी निगडीत ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल या राज्यात ३० ते ४० ठिकाणी छापे मारले आहेत. ६ डिसेंबर रोजी ही छापेमारी सुरु करण्यात आली होती. सोमवारी भाजप खासदारांनी याबाबत लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता.

logo
marathi.freepressjournal.in